मराठी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी ही लेखिका तसेच निर्मातीचीही धुरा सांभाळते. मधुगंधाने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या कथेसाठी लेखन केलं आहे. मधुगंधा लिखित ‘नाच गं घुमा’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार झालं आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली.

आता या सगळ्या धावपळीनंतर मधुगंधा ‘ती’चा क्वालिटी टाईम घालवताना दिसतेय. मधुगंधा सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच मधुगंधाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मधुगंधाने सफेद रंगचा ड्रेस परिधान केलाय. लेखिकेला हा फोटो पोस्ट करताना एक सुंदर कॅप्शन सुचलंय. “आयुष्य हेच एक हॉटेल आहे असं वाटतं, चेक इन होतो आपण, काही काळ राहतो. इच्छा असो नसो, चेक आऊट आहेच !”

हेही वाचा… जान्हवी कपूरने मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या नव्या मालिकेचा प्रोमो केला शेअर; जाणून घ्या कनेक्शन

कॅप्शनमध्ये पुढे मधुगंधाने लिहिलं, “चेक इन करताना चेक आऊटचा दिवसही ठरलेला असतो ! इथे आपण रमतो, घुमतो, राहतो, खातो-पितो; हेच ते ज्याच्यासाठी सगळं केलं असं वाटतं. आपल्याला कुठल्या कॅटेगेरीची रूम मिळणार हे आपण काय कमावलं आहे यावर ठरत ! आयुष्य आणि रिसॉर्ट सगळं तेच आहे. थोडी उसंत मिळाली की काहीसं आध्यात्मिक व्हायला होतं, गरजेचंपण आहे.”

रिसॉर्ट आहे जग हे सारे
चेक इन, चेक आऊट
अव्याहत खेळ अपुरे
संचिताचे भोग हे न्यारे !

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

मधुगंधाच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. पण, सुकन्या मोनेंच्या कमेंटने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. सुकन्या मोने यांनी कमेंट करत लिहिलं, “लिहितेस उत्तमच, पण अलीकडे दिसतेस ही छान…”

हेही वाचा… सलमान खान, रणवीर सिंग अन्…, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी इटलीला निघाले सेलिब्रिटी; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मधुगंधा लिखित ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मधुगंधाने या चित्रपटाची सहनिर्मितीदेखील केली आहे, तर परेश मोकाशी यांनी या चित्रटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.