अभिनेत्री ऋतुजा बागवेने मराठी सिनेसृष्टीत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलंय. ऋतुजा आता हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करतेय. ‘माटी से बंधी डोर’ ही हिंदी मालिका घेऊन ऋतुजा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ऋतुजा वैजयंतीची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

ऋतुजाची ही नवी मालिका उद्यापासून स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेच प्रमोशन सध्या दणक्यात सुरू आहे. एवढच नव्हे तर बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनेदेखील ऋतुजाच्या या मालिकेचा प्रोमो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण नेमकं जान्हवी आणि ऋतुजाचं कनेक्शन काय? जाणून घेऊया.

हेही वाचा… “होगा तुमसे प्यारा कौन?” ‘पारू’ मालिकेतील शरयू आणि पूर्वाचा हटके डान्स व्हायरल; पाहा VIDEO

जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. याला कॅप्शन देत जान्हवीने लिहिलं, “आता संध्याकाळी ७:३० वाजता तुमचं मनोरंजन सुरूच राहिल. जेव्हा मैदानाची माती सोडून तुमचं नात शेतीच्या मातीबरोबर जोडलं जाईल. नक्की बघा, ‘माटी से बंधी डोर’ उद्यापासून संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्लस आणि डिज्नी हॉटस्टारवर”

जान्हवीने अजून एका खास व्यक्तीला या स्टोरीमध्ये मेन्शन करत लिहिलं की, “मला तुमचा खूप अभिमान आहे काकी”. ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेची निर्मिती ‘सोबो फिल्म्स’ या प्रोडक्शन हाऊसद्वारे होतेय. ‘सोबो फिल्म्स’च्या संस्थापिका स्मृती सुशीलकुमार शिंदे या आहेत. ज्या शिखर पहारियाच्या आई आहेत. शिखर पहारिया आणि जान्हवी कपूर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करतायत आणि म्हणून होणाऱ्या सासूबाईंसाठी जान्हवीने ही खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा… आलिया भट्ट लेक राहाबरोबर घालवतेय ‘असा’ वेळ; अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

शिखरनेदेखील त्याच्या आईच्या प्रो़डक्शन हाऊसच्या या मालिकेचा प्रोमो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. “आई तुझा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो” असं सुंदर कॅप्शन शिखरने या प्रोमोला दिलं आहे.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दरम्यान, ऋतुजा बागवेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ऋतुजाने याआधी ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लंडन मिसळ’ आणि ‘सोंग्या’ या चित्रपटांमध्ये ऋतुजा झळकली होती.