प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच नागराज यांनी मराठी सिनेमा इतर प्रादेशिक सिनमांप्रमाणे चालत का नाही, यावर भाष्य केलंय. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नागराज यांना मराठी सिनेमा न चालण्यामागे कोणती कारणं वाटतात, त्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कोणती नशा करतोस?” मोदींच्या आईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केल्याने शाहरुख खान ट्रोल, नेमकं काय घडलं?

‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मराठी सिनेमा हा आशयपूर्ण असतो, पण तरीही चालत नाही. २०२२मध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले, अनेक तरुण दिग्दर्शकांनी उत्तम सिनेमे बनवले, कथा, कलाकार, सर्व गोष्टी चांगल्या होत्या, पण तरीही हे चित्रपट चालले नाहीत. याचं कारण काय, आपण कुठे कमी पडतोय, असं विचारलं असता नागराज म्हणाले, “मी फँड्री चित्रपट केला, तेव्हा मी असा चित्रपट करेन, असा विचारही केला नव्हता. आता घर बंदूक बिरयानी करतानाही मी अशी भूमिका आणि चित्रपट करेन असं कधीच वाटलं नव्हतं. आपले चित्रपट आशयपूर्ण असतात, चांगले असतात, पण आपण सगळेच दाक्षिणात्य चित्रपट बघतो, तसेच मराठी लोकही दाक्षिणात्य चित्रपट बघतात. त्यांना जगभरातील सर्वच भाषांचे चित्रपट बघण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रेक्षक फक्त मराठीपुरते मर्यादित नाहीत,” असं नागराज यांनी सांगितलं.

‘या’ तीन कारणांमुळे शाहरुखचा ‘पठाण’ फ्लॉप होणार; प्रसिद्ध अभिनेत्याचा दावा, म्हणाला, “चित्रपटाचं…”

पुढे ते म्हणाले, “दक्षिणेतील चित्रपटांमध्ये जसे प्रयोग केले जातात, तसे प्रयोग मराठीत करता येत नाहीत. फार घाबरत हे प्रयोग करावे लागतात, कारण मराठी माणसाचा स्वभाव वेगळा आहे. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना मराठी सिनेमे बघायचे असतात. मी सैराट चित्रपट बनवताना घाबरलो होतो, खूप हिंमत करून त्या चित्रपटाची निर्मिती केली होती. आताही घर बंदूक बिरयानी निर्माण करताना तीच भीती वाटत होती,” असं नागराज मंजुळे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule comment on why marathi movies are not performing as good as south movies hrc
First published on: 31-12-2022 at 14:03 IST