scorecardresearch

“अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

निवेदिता सराफ यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

“अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
निवेदता सराफ यांची पतीसाठी खास पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच निमित्ताने अशोक सराफ यांच्या पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

‘वेड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग शोला निवेदिता यांनी हजेरी लावली. निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रितेश देशमुख, जिनिलीया व अशोक सराफ यांच्याबरोबरचा स्क्रिनिंग शो दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. “वेड चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचा फोटो. रितेश देशमुखचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे, असं वाटत नाही. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिने खूप छान काम केलं आहे”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>“प्लीज तुनिषाला वाचवा” असं म्हणत रुग्णालयात शीझान खान रडत होता, डॉक्टरांचा खुलासा

हेही वाचा>>“तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट

पुढे निवेदिता यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे. “अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची क्षमता आजही अशोक सराफ यांच्यात आहे. हा चित्रपट नक्कीच हिट होणार”, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा>>“लघुशंकेवर नियंत्रण नाही, डायपरसाठी पैसे नसल्यामुळे कागद…”, प्रसिद्ध अभिनेता करतोय गंभीर आजाराशी सामना

‘वेड’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. जिनिलीया व रितेशच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावणार का?, हे पाहावं लागेल. 

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 11:17 IST

संबंधित बातम्या