मराठी सिनेसृष्टीत कलरफुल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर अनेकदा चर्चेत आली. सध्या पूजा आणि तिचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत. कारण पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे.

लग्नानंतर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण पूजा व सिद्धेशने ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला. ऑस्ट्रेलियातील घराबाहेर गुढी उभारून पूजा व सिद्धेशने गुढीची पूजा केली आणि यादिवशी त्यांनी खास पुरणपोळीचा बेत केला होता. याचे फोटोज पूजाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता दोघांच्या वीकेंडचे फोटोज चर्चेत आहेत.

पूजा आणि सिद्धेश त्यांचा वीकेंड चांगलाच एन्जॉय करताना दिसतायत. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. “हॅप्पी संडे” असं कॅप्शन देतं अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहेत. यात तपकिरी रंगाच स्ट्रॅपलेस टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट तिने घातली आहे. दोघे आकाशपाळण्यात बसून सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसतायत.

हेही वाचा… आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण! अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

पूजाने शेअर केलेल्या एका व्हिडीओत सिद्धेशने सफेद रंगाचं टी-शर्ट, हिरव्या रंगाचं जॅकेट आणि जीन्स घातलेली यात दिसतेय. ‘ये शाम मस्तानी’ हे गाण जोडत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “वीकेंड वाईब्स” असं कॅप्शन देतं पूजाने पूर्ण दिवसातील क्षण कॅप्चर केले आहेत.

हेही वाचा… मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला पॅरिसमधला खास फोटो; म्हणाला, “माझं प्रेम…”

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळाला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.