Premium

साखरपुड्याच्या घोषणेनंतर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावंही आलं समोर

पूजा सावंतने अखेर दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! रोमँटिक फोटो शेअर करत नावंही केलं उघड

pooja sawant reveals her fiance face after announcement of engagement
पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेश-मुग्धा, स्वानंदी-आशिष, प्रसाद-अमृता या जोडप्यानंतर मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंतने २८ नोव्हेंबरला होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटिक फोटो शेअर करून साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, यापूर्वी शेअर केलेल्या एकाही फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. तिच्या अनेक चाहत्यांनी पूजाचा होणारा नवरा कोण असेल? तो काय काम करत असेल? याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये विचारपूस सुरू केली होती. अखेर अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवत इन्स्टाग्रामवर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : “तो आमचा पहिला मुलगा…”, प्रार्थना बेहेरेच्या घरातील ‘तो’ खास सदस्य आहे तरी कोण?

“मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रचंड उत्साही आहे. लव्ह यू सिड्डी” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सिद्धेश चव्हाण असं अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. पूजाने नवऱ्याचा चेहरा दाखवल्यावर आता नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : ‘झिम्मा २’ फेम सायली संजीव नाटकात काम का करत नाही? अभिनेत्री म्हणाली, “दिग्दर्शक-निर्मात्यांना माझ्यामुळे…”

दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर ‘दगडी चाळ’ या चित्रपटाद्वारे तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. लवकरच पूजा ‘मुसाफिरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja sawant reveals her fiance face after announcement of engagement see photos sva 00

First published on: 29-11-2023 at 11:41 IST
Next Story
“तो आमचा पहिला मुलगा…”, प्रार्थना बेहेरेच्या घरातील ‘तो’ खास सदस्य आहे तरी कोण?