scorecardresearch

कोकणातील डबलबारीतही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ची क्रेझ, व्हिडीओ पाहिलात का?

या गाण्यावरील कोकणातील डबलबारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ved, ved movie, ved film, Genelia deshmukh, genelia dsouza, sayali sanjeev, riteish deshmukh, Ved, Ved marathi film, Ved film, ashok Sharaf, nivedita saraf, Ved box office collection, Ved first day box office collection, जिनिलीया देशमुख, जिनिलीया डिसूझा, सायली संजीव, रितेश देशमुख, वेड, वेड मराठी चित्रपट, वेड चित्रपट, अशोक शराफ, निवेदिता सराफ, वेड बॉक्स ऑफिस कलेक्शन, वेड बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस, वेड, वेड चित्रपट
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता रितेश देशमुखचा चित्रपट ‘वेड’ने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत ५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील गाणं ‘वेड लावलंय’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यात रितेशबरोबर सलमान खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. संपूर्ण महाराष्ट्रात हे गाणं लोकप्रिय ठरताना दिसतंय. अशात या गाण्याचा कोकणातील डबलबारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे आणि या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याची लोकांमध्ये बरीच क्रेझ आहे. अनेकांनी या गाण्यावर धम्माल डान्स करत वेगवेगळे रील्स शेअर केले आहेत. अशात आता सोशल मीडियावर कोकणातील भजनाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

आणखी वाचा- चौथ्या आठवड्याच्या शेवटीही ‘वेड’चा जलवा कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘मी कोकणातलो’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भजन गाणारे बुवा ‘वेड लावलंय’ हे गाणं गाताना दिसत आहेत आणि शेवटी ते गाण्यातील रितेशची सिग्नेचर स्टेप करतानाही दिसत आहेत. कोकणात भजन आणि डबलबारीचे बरेच चाहते आहेत अशात डबलबारीत ‘वेड लावलंय’ हे गाणं ऐकल्यानंतर सर्वजण शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यात रितेश देशमुखलाही टॅग करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ‘वेड’ चित्रपटातील सत्या व श्रावणीचं रोमँटिक गाणं प्रदर्शित, रितेश-जिनिलीयाच्या रोमान्सची दिसली झलक

दरम्यान या चित्रपटाच्या टिझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 09:13 IST
ताज्या बातम्या