मराठी सिनेसृष्टीतील आदर्श व लोकप्रिय जोडी म्हणजे संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी. गेली कित्येक वर्ष हे दोघं विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करून दोघांनी प्रेक्षकांची मनं जिंकून कायमच स्थान निर्माण केलं आहे. अशी लोकप्रिय जोडी गेली २२-२३ वर्ष एकत्र काम करत नाहीत. यामागच्या कारणाचा खुलासा अभिनेते संजय मोने यांनी केला आहे.

हेही वाचा – Video: ‘अबोली’मधील दमदार भूमिकेनंतर सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत, सोबतीला असणार ‘देवयानी’मधील ‘हा’ अभिनेता

‘तारांगण’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना संजय मोने यांनी पत्नीबरोबर एकत्र काम न करण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “माझ्या मुलीला जास्त वेळ देता यावा म्हणून लग्नानंतर आम्ही ठरवलं की, मुलीच्या जन्मानंतर २२-२३ वर्ष कधीच एकत्र काम करायचं नाही. त्यामुळे आम्ही कधीही एकत्र काम करत नाही. कारण दोघेही एका कामासाठी गेलो तर मुलीकडे लक्ष कोण देणार? मुलीला आपली १६-१७ वर्षांची होईपर्यंत गरज असते. पुढे तिला गरज लागत नाही.”

संजय व सुकन्या मोनेंच्या मुलीचं नाव

दरम्यान, लग्नानंतर अपघातामुळे सुकन्या अंथरुणाला खिळल्या होत्या. डॉक्टरांनी सुकन्या मोनेंना मूल होऊ न देण्याचा सल्ला दिला होता. पण सुकन्या मोने आपल्या निर्णयावर ठाम होत्या. संजय मोने आणि सासूबाईंनी त्यांच्या मुलं होण्याच्या निर्णयाला विरोध केला. मात्र, सुकन्या हट्टाला पेटल्या होत्या आणि मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या मुलीचा जन्म झाला. ज्युलिया असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.

हेही वाचा – “नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”

संजय व सुकन्या मोनेंची मुलगी काय करते?

ज्युलिया वन्यप्राणी जीवशास्त्र (वाइल्डलाइफ बायोलॉजी) या विषयात शिक्षण घेत आहे. ‘मास्टर इन अ‍ॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ असं तिच्या संपूर्ण पदवीचं नाव आहे. ज्युलियाला बालपणापासून जंगल सफारी व प्राण्यांविषयी फार आवड आहे. त्यामुळे तिनं भविष्यात प्राणीशास्त्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.