अभिनेता सुयश टिळकनं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक आहे. त्यानं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. खऱ्या अर्थाने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत सुयशनं साकारलेली जयराम भूमिका चांगलीच गाजली.

अलीकडेच सुयश ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘अबोली’ मालिकेत झळकला. या मालिकेत त्यानं सचित राजेची भूमिका साकारली होती. पण या भूमिकेत सुयश १५ वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळाला. कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात दिसला. सुयशच्या या भूमिकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘अबोली’ मालिकेनंतर सुयश नव्या रुपात नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”

‘सन मराठी’ वाहिनीवर ‘आदिशक्ती’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच मालिकेत मुख्य भूमिकेत सुयश टिळक झळकणार आहे. त्याच्या साथीला ‘देवयानी’ मालिकेत झळकलेला अभिनेता सुश्रुत मंकणी पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री पल्लवी पाटील, अंबरीश देशपांडे, बालकलाकार सावी केळकर दिसणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील गावकऱ्याला वाचवण्याचा सीन ‘असा’ झाला होता चित्रीत, सुमीत पुसावळेनं शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, सुयश टिळकची ‘आदिशक्ती’ नवी मालिका ६ मेपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘सन मराठी’वर ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे.