ठाण्यात मुक्या प्राण्यांचं ग्रूमिंग सेशन करणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमधील एक धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संबंधित क्लिनिकचा कर्मचारी एका श्वानाला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत मयुर आडाव आणि प्रशांत गायकवाड यांना ताब्यात घेतलं होतं. परंतु, काही दिवसांत या दोघांची सुटका झाली. सुटका झाल्यावर हे दोघेही सध्या फरार आहेत.

In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

‘स्ट्रिट डॉग्ज ऑफ बॉम्बे’ या प्राणीप्रेमी संस्थेने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आरोपींची सुटका झाल्याचं समजताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. “कुत्र्याला मारहाण व हिंसाचार करून तुमची ५० ते १०० रुपये दंड भरून जर सुटका होत असेल…तुम्ही पळ काढण्यात यशस्वी होत असाल तर अवघड आहे. हे योग्य आहे का?” असा संतप्त सवाल सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट शेअर करत केला आहे.

हेही वाचा : लग्नानंतर मुग्धा-प्रथमेशचा उत्तर प्रदेश दौरा, जोडीने घेतलं गंगेचं दर्शन; म्हणाले, “गंगा मैय्याच्या किनाऱ्यावर…”

मराठी अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत “गुन्हेगार पळतो आणि सामान्य अडकतो! लोक सहज सुटून पळू शकतात!” असं म्हटलं आहे. याशिवाय अभिनेत्री क्षिती जोगने देखील आरोपींची सुटका झाल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “कन्नड चित्रपटात स्विमसूट घालायला सांगितला अन्…”, वर्षा उसगांवकरांनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “माझे वडील…”

siddharth
सिद्धार्थ चांदेकर व हेमंत ढोमे

दरम्यान, रितेश देशमुख, वरुण धवन, प्रतीक बब्बर, अली गोनी यांसारख्या कलाकारांनी देखील ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.