‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ यांसारख्या चित्रपटातून वैभव तत्ववादीने अभिनयाचा ठसा उमटवला. वैभवने मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका या बॉलिवूड चित्रपटांमधील वैभवने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता वैभव सर्किट या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मनोरंजन विश्वात काम करताना वैभवचं नाव अनेक मराठी अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. अभिनेत्री पूजा सावंत व वैभव तत्ववादीची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडली होती. तसंच प्रार्थना बेहेरेबरोबरच्या त्याच्या जोडीलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. प्रार्थना बेहेरबरोबर वैभव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर पूजा सावंतबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत वैभवने या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

हेही वाचा>>“मला वैभव तत्ववादी आवडायचा” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “तिने मला…”

“अनेक अभिनेत्रींबरोबर तुझं नाव जोडलं गेलं होतं. पूजा व प्रार्थनाबरोबर अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्या खऱ्या होत्या की खोट्या?” असा प्रश्न वैभवला विचारण्यात आलं. यावर उत्तर देत वैभव म्हणाला, “आम्ही चांगले मित्र होतो आणि आहोत.”

हेही वाचा>> जेव्हा सेटवर डीप नेक शॉर्ट ड्रेस घालून आलेली कतरिना कैफ, सलमान खानने अभिनेत्रीला कपडे बदलायला सांगितले, कारण…

दरम्यान, वैभव तत्ववादी व ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत असलेला ‘सर्किट’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. आकाश पेंढारकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मधूर भांडारकरांची निर्मिती आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे व रमेश परदेशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.