अशोक सराफ हे नाव म्हणजे मराठी सिने आणि नाट्य प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी. गेल्या ४ दशकांपासून ते रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपले आजी-आजोबा, आई-वडील जितके आवडीने अशोक सराफ यांचे चित्रपट पाहतात, तितक्याच आवडीने आजची पिढीही त्यांचे चित्रपट पाहते. आणि यापुढचीही पिढी देखील त्याचं आवडीने अशोक सराफ यांचे चित्रपट पाहतील, असं म्हणायला काही हरकत नाही.

मराठी सिनेसृष्टीतील अशोक सराफ यांची दमदार सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटानंतर झाली. त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा हा चित्रपट ठरला. एक साधा अन् एक भ्रष्टाचारी हवालदारांची गोष्ट ‘पांडू हवालदार’मधून सांगण्यात आली. या चित्रपटातील अशोक सराफ यांनी साकारलेला हवालदार सखाराम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. त्यांची ही भूमिका अक्षरशः डोक्यावर घेतली होती. शिवाय हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की, ‘पांडू हवालदार’चं अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट. पण नाही. यापूर्वी अशोक सराफ यांनी दोन चित्रपट केले होते; ज्यानंतर त्यांनी चार वर्षांचा ब्रेक घेतला. नेमकं काय घडलं होतं? वाचा हा रंजक किस्सा…

Manthan Screening at Cannes 2024
प्रदर्शनानंतर ५० वर्षांनी ‘मंथन’चं Cannes मध्ये खास स्क्रीनिंग, ५ लाख शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेला चित्रपट!
Biographies The film Srikanth tells the story of the struggle of a stubborn young man
श्रीकांत : एका जिद्दीची हृदयस्पर्शी कथा
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Marathi actress Sukanya Mone shares special post on Sarfarosh movie 25th anniversary
‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट, जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “आमिर खान…”
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

हेही वाचा – मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

अशोक सराफ यांना पहिल्यांदा कॅमेरासमोर उभा राहण्याचा योग ‘आयलं तुफान दर्याला’ या चित्रपटामुळे आला. अशोक यांच्या मामांच्या कंपनीचे मॅनेजर पाटील म्हणून होते. त्यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले होते आणि त्यांनीच अशोक सराफ यांचं नाव सुचवलं होतं. अशोक यांनी कोणताही विचार न करताना क्षणार्धात होकार दिला. कारण त्या काळात अनेक कलाकार चित्रपटात काम करत होते. त्यामुळे अशोक सराफ यांना देखील असं झालं की, मी का नाही चित्रपटात काम करू शकणार? म्हणून उत्तम अभिनयाच्या जोरावर अशोक यांनी ‘आयलं तुफान दर्याला’साठी होकार दिला. जयवंत पाठारेंनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अशोक सराफ यांनी हे नाव ऐकलं होतं. या चित्रपटात ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रमेश देव व अभिनेत्री उमा प्रमुख होत्या. तर अशोक यांची सरपंचाची एक छोटी भूमिका होती.

‘आयलं तुफान दर्याला’च्या चित्रीकरणाच्या वेळी अशोक सराफांना पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभं राहण्याची अजिबात भीती वाटली नाही. नाटक करत असल्यामुळे त्यांना कोणतंही दडपण आलं नव्हतं. नाटकात प्रेक्षक जसे समोर असतात, तसंच इथे कॅमरासमोर असतो, इतकाच काय तो फरक, असं त्यांनी मनाशी ठरवून ठेवलं होतं. देहबोली, हावभाव हे आवश्यकतेनुसार द्यायचे म्हणजे झालं. पाठांतर चांगलं असल्यामुळे अशोक सराफ यांना स्वतःच्या कामावर आत्मविश्वास होता. १९७३ साली ‘आयलं तुफान दर्याला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेव्हा अशोक यांनी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला अन् स्वतःची भूमिका पाहिली. तेव्हा मात्र त्यांना जाणवलं की पडद्यावर आपण किती अस्ताव्यस्त दिसतोय. या चित्रपटात ते कोळ्याच्या वेषात झळकले होते. चित्रीकरण समुद्र किनारी असल्यामुळे अन् वेशभूषेमुळे ते पडद्यावर अवघडलेले दिसले. “या चित्रपटाने मला काहीही शिकवलं नाही. त्यांना जागा भरणारा एक माणूस मिळाला आणि मला जयवंत पाठरेसारखा मित्र. हीच माझी कमाई”, असं अशोक सराफ म्हणालेत.

हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री

त्याआधी १९७१ साली ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात अशोक सराफ झळकले होते. त्यावेळेस ते त्यांच्या बँकेच्या स्पर्धेतल्या नाटकात काम करत नव्हते. मात्र बॅकस्टेज व प्रकाश योजनेची जबाबदारी अशोक सराफ यांच्याकडे होती. नाटक संपल्यानंतर स्पर्धेचे परीक्षक गजानन जहागीरदार यांनी त्यांना बोलावलं. हा निरोप अशोक यांना त्यांच्या एका सहकाऱ्यांनी दिला होता. पण त्यावर त्यांचा विश्वास बसेना. ओळख नसताना का बोलावलीत? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र अशोक सराफ जहागीरदारांना जाऊन भेटले. त्यावेळी पहिलाच प्रश्न, चित्रपटात काम करणार का?, असा विचारला. यामुळे अशोक सराफ यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जहागीरदारांसारखा मोठा माणूस चित्रपटाची ऑफर देतोय हे ऐकून त्यांनी कुठलाही विचार न करताना होकार दिला.

‘घेतलं शिंगावर’ या विनोदी नाटकावर आधारित असलेल्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटासाठी अशोक सराफ यांना विचारणा केली. हे मूळ नाटक त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना हा चित्रपट करताना देखील आत्मविश्वास होता. मेहबूब स्टुडिओमध्ये या चित्रपटाचा सेट लागला होता. अशोक सराफ यांचं चित्रीकरण आठ दिवसांचं होतं. त्यांचा हा चित्रपट हाऊसफुल चालला. पण याही चित्रपटात नाटकासारखा अशोक सराफ यांचा काहीसा कर्कश अभिनय झाला होता. कारण त्यांना कॅमेरासंबंधितल्या तांत्रिक बाबींशी तोंडओळख नव्हती. त्यामुळे अशोक सराफ यांनी या दोन चित्रपटानंतर चार वर्ष कुठल्याही चित्रपटात काम न करण्याचं ठरवलं. या काळात त्यांनी नाटक व चित्रपटातील अभिनय काय असतो? कसा असतो? कॅमेराच्या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. तासनतास ते एडिटिंग रूममध्ये बसायचे.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

या चार वर्षाच्या काळात अशोक सराफ यांना बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर आल्या. शिवाय या काळात त्यांना पैशांची देखील गरज होती. पण तरीही त्यांनी कुठल्याही चित्रपटाला होकार दिला नाही. ते चांगल्या दिग्दर्शकाच्या शोधात होते. जर चांगला दिग्दर्शक मिळाला तर कॅमेरासमोर चांगलं काम करू, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला होता. अखेर तो क्षण आलाच, त्यांना दादा कोंडकेंसारखे उत्कृष्ट दिग्दर्शक मिळाले. अशोक सराफ यांना ‘पांडू हवालदार’ चित्रपटाची ऑफर आली आणि याच चित्रपटामुळे त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला नवीन वळण मिळालं. त्यानंतर अशोक सराफ यांची एकप्रकारे घोडदौड सुरू झाली.