नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, ‘नाजुका’च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सुपरहिट ‘अगडबम’ च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझा अगडबम’ या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती भोईरची प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माती अशा चार वेगवेगळ्या भूमिकांतून ती लोकांसमोर येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचा : ..म्हणून वैतागून सोनमचा ट्विटरला रामराम 

सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराखुरा सुमो पहलवान, डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरसुद्धा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. मात्र या सिक्वलमध्ये थोडा ट्विस्ट आहे. नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेली पण मावळ्याच्या वेशातील एक पहलवान चर्चेत येतो. नाजुकाच ही पहलवान आहे का याची उकल चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होईल.

‘अगडबम’च्या दमदार यशानंतर डबल धमाका करण्यास येत असलेला हा ‘माझा अगडबम’ येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film majha agadbam trailer released subodh bhave trupti bhoir
First published on: 07-10-2018 at 13:28 IST