माणसाच्या मनातल्या भीतीवर भाष्य करणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीतीत नुकतीच दाखवण्यात आली. माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती कशाचीही असू शकते. उंचीची, गर्दीची, एकटेपणाची अगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. काही लोकांच्या मनात ही भीती वाढते हे पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात या विषयावर ‘भय’ चित्रपट भाष्य करतो. दमदार कथानक, युवा कलाकार, श्रवणीय संगीत आणि त्याला कल्पक दिग्दर्शनाची जोड यामुळे हा चित्रपट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरनेदेखील चित्रपटाविषयी उत्सुकता वाढविण्याची किमया साधली आहे.
निर्माते सचिन कटारनवरे व सहनिर्माते अजय जोशी, अनिल साबळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा, संवाद नितीन सुपेकर यांचे असून, शेखर अस्तित्व यांनी गीते लिहिली आहेत. या गीतांना अजित समीर यांचा संगीतसाज लाभला आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे याचं आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चव्हाण यांनी सांभाळली आहे. ‘५ जी इंटरनॅशनल’ प्रस्तुत या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘भय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
माणसाच्या मनातल्या भीतीवर भाष्य करणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीतीत नुकतीच दाखवण्यात आली.

First published on: 06-07-2015 at 03:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie bhay