scorecardresearch

प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अजाणावर भाष्य करणारा ‘भोंगा’ चित्रपट २४ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' चित्रपट चित्रपट २४ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच आपले नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या हृदयावर कोरले. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने वा कथेच्या जोरावर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. सततच्या आवाजाने लहान मुले, आजारी माणसे आणि वयोवृद्धांना त्रास होतोच मात्र त्यावर तोडगा हा काहीच निघत नाही. आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोराच देते असे म्हणणे वावगे ठरणार नाही, आणि असेच दृश्य आणि मनाला चटका लावणारा विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या आयुष्यात कंगनाला महत्व नाही’, तापसीने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर

‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

marathi movie bhonga set to releasred on 24th september
ध्वनी प्रदूषणावर या चित्रपटाची कहाणी आहे.

आणखी वाचा : समंथा अक्किनेनीने केली ‘शाकुंतलम’च्या चित्रीकरणास पुन्हा सुरुवात

या चित्रपटाची निर्माते आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. तर ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास यांनी उत्तमरीत्या सांभाळली. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे , श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य ,आकाश घरत यांचाही अभिनय पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-06-2021 at 13:11 IST

संबंधित बातम्या