शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून उलगडण्यात आला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट येत्या रविवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला झी युवा वाहिनीवर दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात मुघलांसोबत झालेल्या लढाईवर हा चित्रपट चित्रित केलेला आहे. शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने पुण्यातील लाल महालावर हल्ला करून महाकाय शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हा हल्ला म्हणजे फक्त एक शौर्य गाथा नसून बलाढ्य मुघल सैन्याला मारलेली चपराक होती. भारतातील सर्वात पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून या घटनेकडे बघितले जाते.

मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनुप सोनी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे या सारख्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केलेले संगीत आणि संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. फत्तेशिकस्त बघताना प्रेक्षक नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात हरवून जातील आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासातुन कोणत्याही संकटाशी लढण्याची ताकद मिळेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie fatteshikast will premine on zee yuva avb
First published on: 22-09-2020 at 15:48 IST