‘फाइट’ २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

मराठीत अॅक्शनपॅक्ड म्हणता येतील, असे फारच थोडे चित्रपट आहेत. आता ही उणीव ‘फाइट’ हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे. फ्युचर एक्स प्रॉडक्शनच्या ललित ओसवाल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ आणि दमदार कथानक असलेला “फाइट” हा चित्रपट २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेल्या या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे, कमल ठोके, आसिफ इब्राहिम यांच्यासह जीत मोरे, सायली जोशी, निशिगंधा कुंटे, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापूरकर, अनुप इंगळे, मंगेश नंदे, राहुल फलटणकर, करम भट हे नव्या दमाचे कलाकार आहेत. तर जीत मोरे हा नवोदित अभिनेता चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.

स्वप्नील महालिंग यांनी चित्रपटाचं कथा, पटकथा, संवादलेखन केलं आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन आणि स्वप्नील गोडबोले यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून, अजय गोगावले गाणं गायलं आहे. त्याशिवाय विकी सक्सेना यांनी रॅप साँग गायलं आहे. प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi movie fight poster launch

ताज्या बातम्या