इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना मार्गी लावण्याचे काम प्रत्येकजण करत असतो. यात प्रत्येकाला यश अपयशाच्या पायऱ्या देखील चढायला लागतात. यश-अपयशाच्या समीकरणावर लढणारी लढाई ही नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाते. असाच शिखर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका नवोदित तरुणाने गाठला आहे. सिनेमा बनवण्याच्या वेडापायी त्याने चक्क आयफोनवर सिनेमा चित्रित केला आहे. दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत दिगंबर वीरकर ‘पिच्चर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आयफोनवर चित्रित होणारा हा पहिलावहिला ‘पिच्चर’ सिनेमा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता चित्रित करण्यात आलेला या चित्रपटाची कथा अधिकच उत्सुकता वाढवणारी आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे यावर थोडक्यात चित्रपटाची कथा वळण घेते. आयफोनवर चित्रित होऊन प्रदर्शित झालेला हा ‘पिच्चर’ चित्रपट गाण्यांशिवाय गावाकडील नजाखत उंचीवर नेत आहे. या चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला केदार दिवेकर याने पार्श्वसंगीत दिले असून चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर याने केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie pichchar shoot on i phone avb
First published on: 25-05-2021 at 16:32 IST