महाराष्ट्रातील लाडक व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे यांच्याविषयी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक विशेष स्थान आहे. आपल्या नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे पु.ल यांचं व्यक्तीमत्व काही निराळचं होतं. आजपर्यंत त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना या ना कारणाने उजाळा देण्यात आला आहे. त्यातच आता संगीतकार कौशल इनामदारने पु.लंसोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

कौशलने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत भाई अर्थात पु.ल.देशपांडे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुलंसोबत काळ घालवण्यासारखा दुसरा आनंद नसल्याचं म्हणत त्याने या फोटोमागची कथा सांगितली आहे.

‘संगीत क्षेत्रात स्वत:च अस्तित्व निर्माण करत असताना माझं गाणं पु.ल.देशपांडे यांनी ऐकलं आणि चक्क मला भेटण्यासाठी बोलावून घेतलं. पुलंचं असं अचानकपणे मला बोलावणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. परंतु ही भेट माझ्या कायम स्मरणात राहिली, असं कौशलने शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला, मरणापुर्वी आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत अशी साऱ्यांची इच्छा असते.तशी माझीही पुलंना भेटण्याची इच्छा होती आणि ही इच्छा माझी अपोआप पूर्ण झाली. माझी केवळ एक-दोन गाणी ऐकल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलावणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती.दरम्यान, कौशल इनामदार मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार असून तो अनेक वेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. त्याने आतापर्यंत अनेक घटनांवर सोशल मीडियावर भाष्य केलं आहे.