चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध गीतकार असा त्याचा आज लौकिक आहे. मात्र त्याची ओळख तेवढय़ापुरतीच मर्यादित नाही. तो उत्तम चित्रकार आहे, व्यंगचित्रकार आहे, अभिनेता आहे, लेखक आहे, कविमनाचा तर तो आहेच. आणि तरीही कु ठल्याही पुरस्कार किं वा ग्लॅमरच्या झगमगाटांपासून गुरू ठाकूर हे नाव अलिप्तच आहे. जोपर्यंत रसिक आपल्या गाण्याला  आपलंसं करत नाहीत तोवर ते गाणं यशस्वी होत नाही. ‘मन उधाण वाऱ्याचे’ असो वा ‘देवाक काळजी’ या माझ्या गाण्यांना कधीही पुरस्कार मिळालेला नाही. मात्र अजूनही ती लोकांच्या ओठावर आहेत, याचाच अर्थ त्यांना दीर्घायुष्य लाभलं आहे. हे रसिकप्रेम हाच कलावंतासाठी खरा पुरस्कार आहे, असेच मी मानतो आणि त्यांना भिडतील अशीच गाणी मी लिहीत आलो आहे, असे गुरू ठाकूर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात गीतकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गुरू ठाकूर यांनी प्रत्येक वेळी आपल्याला हव्या त्याच क्षेत्रात नियोजनबद्ध के लेला प्रवासच यशाकडे घेऊन जातो हे गरजेचे नसल्याचे स्वानुभवावरून सांगितले. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून कधी गप्पा मारत तर कधी कवितेचे बोट धरून त्यांनी आपला आजवरचा बहुपेडी प्रवास उलगडला. संवादक मिलिंद कुलकर्णी आणि ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी त्यांना बोलते के ले. गीतकार म्हणून प्रस्थापित असलेल्या या कलावंताची सुरुवात मात्र व्यंगचित्रकारितेपासून झाली होती, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. तेव्हा ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून संधी कशी मिळाली, हा अनुभव सांगताना महाविद्यालयाच्या प्राचार्यामुळे आपली व्यंगचित्रे ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचली. तिथून बळ मिळालं आणि मग ‘मार्मिक’च्या कार्यालयात जाऊन स्वत:च विचारणा  केल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळी हाताशी गूगलसारखी साधने नव्हती. त्यामुळे राजकीय व्यक्ती, मुख्यमंत्री या सगळ्यांची छायाचित्रे पाहून ती लक्षात ठेवावी लागत असत. सतत व्यक्तींचे आणि आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण यामुळे ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून बस्तान बसले. त्या वेळी तिथे श्रीकांत ठाकरे यांची भेट झाली. त्यांनी नुसते निरीक्षण करण्यापेक्षा व्यक्ती वाचायला शिक, हा सल्ला दिला. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन पुढे अभिनयासाठीही उपयोगी ठरले, हे सांगतानाच एका कलेतूनच दुसऱ्या कलेची वाट सापडत गेल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet lyricist script writer actor and playwright guru thakur zws
First published on: 28-06-2020 at 02:19 IST