मराठी मालिका विश्वात 'जय मल्हार' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशा या मालिकेतील प्रत्येक पात्रही रसिकांच्या रोजच्या आयुष्यातील एक भाग होऊन गेलं. अशाच पात्रांपैकी एक म्हणजे 'म्हाळसा', खंडेरायाची अर्धांगिनी. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडे हिलासुद्धा अगदी कमी काळात प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. सध्या सुरभी चर्चेत आली आहे ते म्हणजे एका वेगळ्याच कारणामुळे. ते कारण म्हणजे सुरभीचा साखरपुडा. सोशल मीडियावर सुरभीच्या साखरपुड्याच्या फोटोंनी सध्या अनेकांचच लक्ष वेधलं आहे. 'म्हाळसा देवी'च्या रुपात दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या सुरभीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचा प्रवेश झाला असून, त्या व्यक्तीचं नाव आहे दुर्गेश कुलकर्णी. जळगावमध्येच सुरभीचा साखरपुडा पार पडला. यावेळी कुटुंबिय आणि मित्रपरिवाचा उपस्थिती होती. वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला अतिशय छोटेखानी अशा या समारंभात सुरभी आणि दुर्गेशच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. सोशल मीडियावर त्यांच्या मित्रपरिवारापैकी जे या सोहळ्याला उपस्थित होते, त्यांनी काही फोटो पोस्ट केले. ज्यामुळेच सध्याच्या घडीला तिच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगत आहेत. साखरपुडा उरकला असला तरीही सुरभी आणि दुर्गेश इतक्यात लगीनघाई करणार नसल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला हे दोघंही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत.