मराठी मालिका विश्वात अवघ्या काही वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनाच कायमचं घर करुन गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे रसिका सुनील, अर्थात सर्वांची लाडकी शनाया. गुरुनाथच्या प्रेमात असणाशी, काहीशी बालिश वागणारी, एखाद्या लहान मुलीप्रमाणे हट्ट करणारी आणि असंख्य चुका करणारी, त्याच चुकांमुळे अडचणींमध्ये सापडणारी अशी ही शनाया म्हणजेच रसिका ही मालिका सोडत आहे.

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिकाने मागील वर्षी अमेरिकेत अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. आता ती त्याच शिक्षणासाठी परदेशात जात असून, मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार असल्याचं कळत आहे. शनायाने म्हणजेच रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुरेख पोस्ट लिहित याविषयीची माहिती दिली असून, या पोस्टमधून आपल्या भावनांनाही वाट मोकळी करुन दिली आहे. गुरुची शनाया, राधिकाची शन्या, अथर्वटी ऑफस्क्रीन शन्नू, बकुळाची शेन्या ही हाक ऐकू आली की लगेचच मागे वळून पाहायची सवय झाली होती… असं म्हणत रसिकाने शनाया या पात्राशी जोडलं गेलेलं तिचं नातं सर्वांसमोर मांडलं आहे. शनाया हे पात्र साकारत असतेवेळी आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. मुख्य म्हणजे या एका शनायाने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्या. याच शनायावर असणारं प्रेम कायम ठेवा आणि रसिकाला तुमचे आशीर्वाद द्या, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

https://www.instagram.com/p/Bm-s4oxBwzw/

https://www.instagram.com/p/BnGe1vWBwWG/

वाचा : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

रसिकाने ही पोस्ट केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पण, त्यासोबतच मालिकेत ती यापुढे दिसणार नसल्याचं दु:खही व्यक्त केलं. आपल्याला प्रेक्षकांचा मिळणारा हा उदंड प्रतिसाद पाहून रसिकाने आणखी एक पोस्ट करत पुन्हा एकदा मायबाप रसिकांचे मनापासून आभार मानले आहेत.