scorecardresearch

Premium

Video: रणजीत ढालेपाटील पुन्हा दिसणार वर्दीत! ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत नवं वळण

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

raja ranichi ga jodi, raja ranichi ga jodi new promo, ranjeet dhalepatil, sanjivani dhalepatil, maniraj pawar, shivani sonar, राजा राणीची गं जोडी, राजा राणीची गं जोडी नवा प्रोमो, रणजीत ढालेपाटील, संजीवनी ढालेपाटील, मनिराज पवार, शिवानी सोनार
रणजीत ढालेपाटील म्हणजेच अभिनेता मनिराज पवार पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसणार आहे.

कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या बरीच गाजताना दिसतेय. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेत या दोघांनी साकारलेल्या ‘रणजीत ढालेपाटील’ आणि ‘संजीवनी ढालेपाटील’ या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या या मालिकेत लवकरच रंजक वळण येणार आहे. रणजीत ढालेपाटील म्हणजेच अभिनेता मनिराज पवार पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसणार आहे.

संजीवनी अल्पवयीन असताना तिच्याशी लग्न केल्यामुळे सस्पेंड झालेला एसीपी रणजीत पुन्हा वर्दीत कधी दिसणार याबाबत प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून उत्सुकता होती पण आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असून रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा एसीपी रणजीत ढालेपाटील म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.

daar ughad baye fame saaniya chaudhari
‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावुक पोस्ट; म्हणाली, “मला…”
Akshara-Adhipati
‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून
Tuzech Mi Geet Gaat Aahe
Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो
Madhurani prabhulkar with her daughter
आईप्रमाणे मुलगीही टॅलेंटेड! मधुराणी प्रभुलकरची लेक बसवतेय नाटक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली…

आणखी वाचा- लाइट्स, कॅमेरा अँड अ‍ॅक्शन! जिनिलिया डिसूझाने सुरू केलं नव्या चित्रपटाचं शूटिंग

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये संजीवनीसोबत रणजीत देखील गुंडांशी दोन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तो खाकी वर्दीत म्हणजेच पोलीसांच्या गणवेशात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘जो कायदा तोडणार, त्याला रणजित फोडणार…’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi serial raja ranichi ga jodi new promo goes viral mrj

First published on: 27-05-2022 at 13:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×