अजय हा संगीतकार असण्यासोबतच एक उत्तम गायक आहे. त्यामुळे त्याने काही चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. ‘रेडू’ या चित्रटातील ‘देवाक काळजी रे’ हे गाणं त्याच्या आवाजात स्वरबद्ध झालं होतं. विशेष म्हणजे या गाण्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाण्याला यूट्युबवर १०० मिलिअन (१० कोटी) व्ह्युज मिळाले आहेत. मराठी चित्रपट संगीतातील बहुमानच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतकार भावांची लोकप्रिय जोडी अजय-अतुलने मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये आपल्या गाण्यांची छाप पाडली आहे. ‘अग्नीपथ’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये अजय-अतुलने त्यांचं संगीत दिलं. त्यामुळे त्यांचा नावलौकिक बॉलिवूडपर्यंत पोहोचला असून त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या जोडीने आजवर अनेक पुरस्कार पटकावले असून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

सागर वंजारी दिग्दर्शित ‘रेडू’ या चित्रपटाची निर्मिती नवलकिशोर सारडा यांनी केली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला हा चित्रपट १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच ‘देवाक काळजी रे’ या गाण्यानं मराठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांनी हे गाणं लिहिलं आहे, विजय नारायण गावंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे.

पाहा : Photo : बोल्ड आणि बिनधास्त चंद्रमुखी चौटाला

 जेमतेम दोन वर्षांत या गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठणं अतिशय आनंददायी आहे. या गाण्याच्या व्हिडीओखाली आलेल्या कमेंट्समध्ये काहींनी नैराश्य दूर झाल्याचं, काहींनी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाल्याचं लिहिलं आहे. मला वाटतं, हा या गाण्यासाठीचा सर्वांत मोठा पुरस्कार आहे. एखाद्या कलाकृतीतून आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो, जगण्याला प्रेरणा मिळते हे या गाण्यानं सिद्ध केलं. विशेष म्हणजे मराठीच नाही, तर परराज्यांत, जगभरात हे गाणं पोहोचणं हे गाण्याचं यश आहे,असं दिग्दर्शक म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi song devak kalji re reach 100 million view on youtube ssj
First published on: 11-02-2020 at 15:28 IST