अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हिन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला. या आरोपांवर आता लुईसने तिला प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेलव्हिन लुईसने सना आणि त्याच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यापूर्वी मेलव्हिनने तिच्यावर केलेले आरोप तिने या क्लिपमध्ये मान्य केले आहेत. तसेच ब्रेकअपचे प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी लावून धरले होते. हे देखील सनाने मान्य केले आहे. ही ऑडिओ क्लिप फोनवर झालेल्या त्यांच्यातील खासगी संभाषणाची आहे.

तसेच या क्लिपवर त्याने, “तू माझ्या कुटुंबाची खिल्ली उडवलीस. तू माझ्यावर वर्णभेदी टिप्पणी केलीस. तू माझ्यावर खोटे आरोप केलेस. मला खात्री आहे की, आता तुला प्रसिद्धी मिळवून खूप आनंद मिळाला असेल.” अशा आशयाची कॉमेंट लिहिली आहे.

काय म्हणाली होती सना खान?

“खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं” मेलव्हिनसोबत ब्रेकअप केल्यानंतर सनाने अशा आशयाची इन्स्टा पोस्ट लिहिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melvin louis replay to sana khan over breakup mppg
First published on: 08-03-2020 at 16:45 IST