बॉलिवूड स्टार आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा यांचा आगामी सिनेमा ‘मेरी प्यारी बिंदू’चे ‘अफिमी’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात परिणीतीचा एक यशस्वी गायिका बनण्याच्या प्रवासासोबतच तिची आणि आयुषमानची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. परिणीतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुषमान कशा प्रकारे तिच्यासोबत कायम उभा असतो हे या गाण्यात दाखवण्यात आले आहे. हे गाणे कौसर मुनीर, प्रिया सरिया आणि वायू या तीन लेखकांनी मिळून लिहिले आहे.
आयुषमानने सोमवारी या गाण्याचा टिझर त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आयुषमान गिटारच्या साथीने हे गाणं गाताना दिसतो. या व्हिडिओला आयुषमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते.
बिंदूला म्हणजे परिणीतीला एक यशस्वी गायक बनायचे असते. तिच्या या स्वप्नात अभि तिच्यासोबत ठामपणे उभा असतो. अभिलाही एक लेखक बनायचे असते. पण तो यशस्वी लेखक बनतो की नाही हे मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ हा सिनेमा मेच्या १२ तारखेला प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमातील आतापर्यंत प्रदर्शित झालेली सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. परिणीतीने गायलेले ‘माना के हम यार नहीं’ हे गाणेही प्रेक्षकांना फार आवडले. आयुषमान आणि परिणीती यांचा एकत्रित असा हा पहिला सिनेमा आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’नंतर परिणीतीने ‘गोलमाल अगेन’च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे तर आयुषमानही ‘शुभमंगल सावधान’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.