सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून मिया खलिफाला ओळखले जाते. मिया खलिफा सध्या सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर म्हणून ओळखली जाते. सध्या ती पॉर्न इंडस्ट्रीतून दूर असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. मिया खलिफाने नुकतंच पॉर्न इंडस्ट्री सोडण्यामागच्या खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. तसेच पॉर्न इंडस्ट्रीमधील काही सत्यही तिने उघड केले आहेत.
मिया खलिफा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मिया खलिफाने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान मियाला विचारण्यात आले की, ‘गुगलवर तुमचे नाव सर्च केल्यानंतर काही व्हिडीओ समोर येतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं का की तुझ्या नावापुढे लागलेला पॉर्न स्टार हा शब्द कधी दूर होईल?’ यावर उत्तर देताना मिया खलिफा म्हणाली की, “मी फारशी गुगल फ्रेंडली नाही. माझ्याशी जोडलेला पॉर्न स्टार हा शब्द काढून टाकण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला आहे. मी विकिपीडियावरही पॉर्न स्टार हा शब्द काढण्यासाठी प्रयत्न केले. पण कंपनीने ऐकले नाही. यानंतर हा शब्द काढून टाकण्यासाठी मी कायदेशीर कारवाई केली होती. पण तरीही कंपनीने काहीही पाऊल उचलले नाही.”
यावेळी तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कशी आलीस? याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “मी एकदा कोणाच्यातरी सांगण्यावरून स्टुडिओत गेली होती. तिथे पॉर्न व्हिडीओ शूट होतात हे मला आधी माहित नव्हते. मला सुरुवातीला तिथे काम करणारे सर्व लोक आवडले. तिथे मला अजिबात अस्वस्थ वाटले नाही. मी पहिल्यांदाच पॉर्न फिल्म केली नाही. पहिल्यांदा ते फक्त माझ्याशी बोलले. त्यानंतर मला तिकडे जायला अजिबात भीती वाटली नाही.”
“त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा मी स्टुडिओमध्ये पोहोचली. तेव्हा मी एक पॉर्न फिल्म शूट केली. तो स्टुडिओ खूप सुंदर होता आणि माझ्यासोबत असे काहीही घडले नाही ज्यामुळे मला वाईट वाटेल,” असेही तिने सांगितले.
यावेळी मिया खलिफाला विचारण्यात आले की, ‘जेव्हा ती लोक तुम्हाला काही विशिष्ट कृत्य करण्यास सांगतात आणि ते जेव्हा तुम्हाला करायचे नसते तेव्हा नेमकं काय होते? काही जबरदस्ती वैगरे होते का?’ या प्रश्नावर उत्तर देताना मिया खलिफा म्हणाली, “नाही, ते तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाहीत. जर त्यांनी जबरदस्तीने कोणतेही लैंगिक कृत्य केले तर तो बलात्कार होईल आणि असे केल्यास तुम्ही कंपनीविरुद्ध तक्रार करू शकता.”
मिया खलिफाने २०१४ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. यानंतर मियाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले. २०१६ मध्ये मियाने सांगितले की, तिने ३ महिन्यांनंतरच पॉर्न इंडस्ट्री सोडली होती. यानंतर, मार्च २०१९ मध्ये तिने स्वीडिश शेफ रॉबर्ट सँडबर्गशी साखरपुडा केला आणि २ महिन्यांनंतर जून २०१९ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर दोन वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला.