‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमणला भारताचा पहिला पुरुष सुपर मॉडल असंही म्हटलं जातं. मिलिंदने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणूनच केली होती आणि त्यात त्याला अपेक्षित यशसुद्धा मिळालं होतं. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेकदा मिलिंदला वादविवादालाही सामोरं जावं लागलं होतं. या वादाचं कारण ठरलं होतं ते म्हणजे गर्लफ्रेंडसोबतचं न्यूड फोटोशूट. अशाच आणखी एका न्यूड फोटोशूटचा एक फोटो मिलिंदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आजही त्याच्या फोटोला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळत असून सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मॉडेलिंगच्या काळातला हा न्यूड फोटो पोस्ट करत मिलिंदने ‘throwback Thursday’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. १९९१ साली केलेला हा फोटोशूट आहे. या फोटोवर त्याच्या पत्नीने भन्नाट कमेंट दिली आहे. ‘..आणि म्हणूनच तेव्हा मी या जगात आले…हॅलो लव्हर’ असं अंकिता कोनवार हिने कमेंटमध्ये म्हटलंय. मिलिंदची पत्नी अंकिता हिचा जन्म १९९१ सालीच झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद आणि अंकिता यांच्यामधील वयाचं अंतर हा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मिलिंद ५४ वर्षांचा असून त्याची पत्नी अंकिता २९ वर्षांची आहे. या दोघांच्या रिलेशनशिपपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मिलिंदनेही त्याचं नातं जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडलं. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले. बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.