अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पासूनच जोरदार चर्चेत होता. परिणामी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २९.१६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘मिशन मंगल’ प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. मात्र अजुनही या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. चाहत्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे आता हा चित्रपट २०० कोटी रुपयांच्या दिशेने विक्रमी मार्गक्रमण करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १९३ कोटी १४ लाख रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद राहिला तर लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या घरात पोहोचेल असे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे.
तरण आदर्श यांनी ट्विटरवर ‘मिशन मंगल’च्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे.
#MissionMangal is now #AkshayKumar’s highest grossing film… Has chances of crossing ₹ 200 cr… [Week 3] Fri 2.20 cr, Sat 3.25 cr, Sun 3.64 cr, Mon 2.27 cr, Tue 1.21 cr, Wed 1.15 cr, Thu 1.31 cr. Total: ₹ 193.14 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 6, 2019
२४ सप्टेंबर २०१४ मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. विशेष म्हणजे मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या धाडसी सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम ‘मिशन मंगल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.