गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात अभिनेत्री, मॉडेल यांच्या मृत्यूच्याच बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बांगलादेशी मॉडेल रिसीला बिंतेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती ढाका येथे राहत होती. पतीसोबत व्हॉट्सअॅप व्हिडिओ चॅट करत असताना अचानक काही तरी झाले आणि तिने गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

रंगभूमीमुळे मला नोकरी मिळाली- विजय पाटकर

https://www.instagram.com/p/BUujZnmFaR0/

रिसिलाला एक मुलगीही आहे. २०१२ मध्ये रिसिलाने फॅशन शोच्या माध्यमातून मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरूवात केली होती. अजूनपर्यंत तिच्या आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. पण, असे म्हटले जाते की, गेल्या अनेक दिवसांपासून रिसिला आणि तिच्या पतीमध्ये वादविवाद सुरू होते.

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरुखला कोर्टाची नोटीस

https://www.instagram.com/p/BTS5uq1FSJn/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या मते, रात्री पतीसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग करत असताना तिने गळफास घेतला. मित्र- मैत्रिणींनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. सोमवारी दुपारी २ वाजता तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. जेव्हा रिसिलाने गळफास घेतला तेव्हा तिची ३ वर्षांची मुलगी आजी- आजोबांकडे होती.