‘होम स्वीट होम’, ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘६६ सदाशिव’ लागोपाठ वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांसमोर आले होते. गेली अनेक र्वष हिंदी-मराठी चित्रपटांमधून मोहन जोशी यांनी सातत्याने खलनायक, चरित्रनायकाच्या भूमिका केल्या आहेत. आता लवकरच मोहन जोशी ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सिनियर सिटीझन’ हा चित्रपट अजय फणसेकर दिग्दर्शित असून ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांची निर्मिती केली आहे. राजू सावला क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.

अतिशय दमदार अशा लूकमध्ये मोहन जोशी या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा काय हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार हे निश्चित. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan joshi is going to play role in movie avb
First published on: 16-10-2019 at 17:47 IST