नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिज म्हणजे ‘मनी हाइस्ट.’ या सीरिजचा पाचवा सिझन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा शेवटचा सिझन असल्याचे निर्मात्यांनी घोषीत केले असले तरी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पाचव्या सिझनचा दुसरा भाग म्हणजेच व्हॉल्यूम २ येणार होता. आज, ३ डिसेंबर रोजी हा व्हॉल्यूम २ प्रदर्शित झाला आहे.

मनी हाइस्टच्या पाचव्या सिझनचा शेवट पाहायता व्हॉल्यूम २ची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली. या दुसऱ्या भागात अखेर प्रोफेसर सगळ्यांसमोर येत बँकेत अडकलेल्या आपल्या टीमला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मागील भागात टोक्योचा मृत्यू झाला आहे. तर आताच्या भागांमध्ये र्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इत्जियर इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे हे कलाकार दिसणार आहेत.
आणखी वाचा : ‘त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध…’, अभिनेत्रीने ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रोडक्शन कंट्रोलरविरोधात केली तक्रार

मनी हाइस्टचा पाचव्या सिझनमध्ये पाच एपिसोड होते. त्यानंतर आता व्हॉल्यूम २ मध्ये देखील पाच एपिसोड आहेत. या प्रत्येक एपिसोडला वेगळी नावे देण्यात आली आहे. सहाव्या एपिसोडला “एस्केप व्हॉल्व” नाव दिले आहे. तर सातव्या एपिसोडचे नाव ‘विशफुल थिंकिंग.’हा सतवा एपिसोड बर्लिन आणि पालेर्मोच्या फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार असेल. “द थिअरी ऑफ एलिगन्स” या आठव्या भागात टीममधील काही आनंदी क्षण पाहायला मिळत आहेत. नवव्या भागाचे नाव ‘पिलो टॉक’ तर दहाव्याचे नाव ‘ए फॅमिली ट्रेडिशन’ असे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनी हाइस्टचा पाचव्या सिझनचा व्हॉल्यूम २ आज दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.