भारतात सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. त्याने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चे सूत्रसंचालन करत अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका छोट्याश्या घरातून आलेला कपिल शर्मा आज कोट्यावधींचा मालक आहे.

कपिल शर्माने आज जे काही कमावले आहे ते मेहनतीच्या जोरावर. एका छोट्या कुटुंबातून आलेल्या कपिल शर्माचे करिअर आज यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहे. त्याचा शो टीआरपी यादीमध्ये देखील पुढे आसल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याच्या शोने १०० भाग पूर्ण केले आहेत. तसेच त्याच्या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारदेखील हजेरी लावतता. त्यामुळे कपिल शर्मा आज कोट्याधीश झाला आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि आलिशान घरे आहेत.

 

View this post on Instagram

 

Good morning everybody.. day starts with workout n yoga.. lots of love to all of u :))

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

आणखी वाचा : कपिल शर्मा एक एपिसोडसाठी घेतो इतके कोटी, जाणून व्हाल थक्क!

चला जाणून घेऊया कपिल शर्माकडील सर्वात महागड्या पाच गोष्टी…

-या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कपिलचे पंजाबमधील आलिशान घर आहे. या बंगल्याची किंमत २५ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.
-दुसऱ्या क्रमांकावर त्याचा डी एच एल एन्क्लेवमधील फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत १५ कोटी रुपये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-तर तिसऱ्या क्रमांकावर कपिलची वॅनिटी वॅन आहे. या वॅनची किंमत ५.५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
-वोल्वे एक्ससी ९० ही गाडी कपिलच्या सर्वात महागड्या वस्तूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या गाडीची किंमत १.३ कोटी रुपये आहे.
-तर पाचव्या क्रमांकावर कपिलची Mercedes Benz S Class ही गाडी आहे. १.१९ कोटी रुपये या गाडीची किंमत आहे.