आता मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब

महिन्यातून एकदा चित्रपट दाखवले जाणार

हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी खुला

मुलांना चित्रपटाच्या अधीक जवळ आणण्यासाठी एका नवीन पुढाकारानुसार एन.एफ.ए.आय. आणि अर्भाट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष चित्रपट क्लब सुरू करण्यात येत आहे. दर महिन्याला चित्रपट स्क्रीनिंगद्वारे चित्रपटसृष्टीच्या वारश्याबद्दल परिचित करून देणे हे या चित्रपट क्लबचे उद्दिष्ट आहे. हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी खुला होईल आणि चित्रपटाचे स्क्रीनिंग महिन्यातून एकदा शनिवार किंवा रविवार या दिवसांमध्ये आयोजित करण्यात येईल.

पहिला स्क्रिनिंग चित्रपट हा निर्माते सत्यजित रे यांच्या अनन्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिल्म ‘सोनार केल्ला’ (१९७४), फेलुदा डीटेक्टीव मालिकेतून असून चित्रपट २५ फेब्रुवारी,२०१७ रोजी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान एन.एफ.ए.आय, कोथरूड येथे दाखवण्यात येणार आहे.
आपल्या मुलांमध्ये चित्रपटाच्या जादूची जागरूकता रुजवण्यासाठी आणि त्यांची संवेदनशीलता वाढवण्याच्या हेतुने हा चित्रपट क्लब असून यामुळे एक पोषक चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्यात मदत करेल.

“मुलांना अभिजात चित्रपटांचा खजिना अनुभवण्यास मिळावा म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या उपक्रमाद्वारे लहान वयातच चित्रपट संस्कृतीचा प्रसार होण्यात मदत होईल. आम्ही विविध शाळांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे, असे एन.एफ.ए.आयचे दिग्दर्शक प्रकाश मगदुम यांनी सांगितले.

दिग्दर्शक आणि अर्भाट चित्रपटाचे संस्थापक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, “मुलांनी जगातील महान चित्रपट पाहावेत ज्यामुळे त्यांची स्वभाववृत्ती प्रभावित होईल. एनएफएआय देशातील सर्व महत्त्वपूर्ण चित्रपट उपक्रमांचे केंद्र आहे आणि अर्भाट फिल्म्स या उपक्रमाद्वारे एन.एफ.ए.आय. सोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Movie club especially for kids

ताज्या बातम्या