करोना व्हायरसमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सगळीकडे चित्रीकरणास परवानगी देण्यात आली आहे. पण सोशल डिस्टंसिंगचे सेटवर पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हॉलिवूड चित्रपटांमध्ये सेक्स सीन्सचे चित्रीकरण करण्यासाठी आता CGIचा वापर करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार १२ जून पासून हॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी फिल्‍म एडिटर्स ट्रेड असोसिएशनने २२ पानांची गाईडलाईन जाहिर केली आहे. यामध्ये कास्ट आणि क्रू मेंबर्सची दररोज टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच क्लोज कॉन्टॅक्ट सीन हे पुन्हा लिहिण्यात यावेत किंवा असे सीन्स सध्या टाळावेत असे म्हटले आहे. किंवा CGI च्या मदतीने हा सीन शूट करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie sex scenes will be replaced with cgi wizardry to cut coronavirus risk avb
First published on: 09-06-2020 at 18:44 IST