MTV लव्ह स्कूल फेम जगनूर अनेजाचे निधन झाले आहे. आज, २३ सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी जगनूर अनेजा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इजिप्तमधील मिस्त्र येथे गेला होता. त्याने तेथील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. बुधवारी देखील जगनूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिस्त्रमध्ये फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो एकदम ठिक असल्याचे दिसत आहे. पण आज, गुरुवारी त्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे.

बुधवारी व्हिडीओ शेअर करत जगनूरने ‘माझे एक स्वप्न पूर्ण झाले. मी गीझा येथील पिरॅमिड पाहिला. माझ्या बकेट लिस्टमधील एक विश पूर्ण झाली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. त्यानंतर आज जगनूरचे निधन झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगनूरने एमटीव्ही लव्ह स्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. त्याने एक्स गर्लफ्रेंड मोनिकासोबत झालेला वाद मिटवण्यासाठी शोमध्ये सहभाग घेतला होता. पण त्यांचा ब्रेकअप झाला.