करोना काळात अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले तर काही लोकांचे संबंध हे खराब झाले. प्रेम करणं जितकं कठीण आहे त्याहून जास्त कठीण प्रेम टिकवून ठेवणं आहे. अशीच एक कहानी घेऊन एक म्युझिक व्हिडीओ लवकरच आपल्याला भेटायला येत आहे. या गाण्याचं नावं अधुरी कहानी असं आहे.

हे गाणं लोकप्रिय संगीतकार आणि इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा फायनलिस्ट हरीश मोयलने लिहिले आहे. गाण्याचे दिग्दर्शन जे जैन यांनी केले आहे. तर या गाण्याची निर्मिती ही राजलक्ष्मी या क्रिएशनने केली आहे. त्यांनी आतापर्यंत ३० बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटामध्ये योगदान दिले आहे. अभिनेत्री कृषेका पटेल ही या गाण्यातून डेब्यु करत आहे. एवढंच नाही तर ती एक प्रेमीकेची भूमिका साकारत आहे. हा तिचा पहिला प्रोजेक्ट असून, कृषेकाला प्रसिद्ध न्यूयॉर्क फिल्म अकादमीकडून फॅशनचा शोचा अनुभव आहे. तिने चॅनल V वरील द बडी प्रोजेक्टमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

आणखी वाचा : ‘एवढं मोठ घर काय कामाचं आहे…’, हातातील कॉफी मगमुळे करीना झाली ट्रोल

जगभरात ३ हजारहून अधिक लाइव्ह शो सादर केल्यावर, मोयल म्हणाला, “व्हिडिओसाठी लिहिणं हा स्वतःसाठी एक वेगळाच अनुभव होता. दिग्दर्शक सुनील जे.जैन यांचे विशेष आभार, ज्यांनी ३ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दुःखाचे सुंदर वर्णन केले. २१ दिवसाच्या काळात मुंबईच्या मध आयलँडवर मुसळधार पावसात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले.