दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. आता घटस्फोटाच्या निर्णयानंतर नागा चैतन्यने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

नागा चैतन्यने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने एका तेलुगू चित्रपटाचे पोस्ट शेअर केले असून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने चित्रपटाचे टायटल साँग शेअर केले आहे.
आणखी वाचा : ‘मला मूल नको.. माझा गर्भपात झाला…’, समांथाच्या त्या पोस्टला रकुलचा पाठिंबा

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.