मराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार सिनेमा देऊन प्रेक्षकांना याड लावणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तर १०० कोटींचा आकडा देखील पार केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले नागराज यांची एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट चित्रपटांसोबतच नागराज यांनी तितक्याच उत्तम शॉर्टफिल्म्स देखील बनवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागराज यांच्या ३ शॉर्टफिल्म्स झी टॉकीज वाहिनीवर पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहेत. येत्या रविवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता नागराज यांच्या शॉर्टफिल्म्स ‘नागराजचा पिटारा’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नागराज यांच्या या पिटाऱ्यात ‘पावसाचा निबंध’, ‘बिबट्या – द लेपर्ड’ आणि ‘पायवाट’ या तीन शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule short film streaming on zee talkies on sunday avb
First published on: 16-07-2020 at 15:02 IST