नावाजलेल्या कलाकारांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट काढायचे आणि त्यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधानं करणं हे काही नवीन नाही. वादग्रस्त विधानं ही त्या कलाकारानेच केली आहेत असा अनेकांचा समज होतो. त्यामुळे यातून वादही निर्माण होतात.
आपल्याकडे असेही गुणी कलाकार आहेत जे त्यांचं काम करत राहतात आणि सोशल मीडियापासून लांबंच असतात. पण तरीही त्यांच्या कामाने मोठे झालेले हे कलावंतही अशा सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचे बळी पडतात. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ही त्यातलीच नावं.
सोशल मीडियापासून हे दोन्ही कलाकार तसेच लांबच होते. पण, त्यांच्या नावाचा गैरवापर करुन फेसबूक, ट्विटरवर अकाऊंट्स उघडण्यात आली आहेत. शिवाय व्हॉट्सअॅपवर त्यांच्या नावाने सतत कोणते ना कोणते मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात.
‘नाम फाउण्डेशन’साठी सुरु करण्यात आलेल्या बँक अकाऊंटचे चुकीचे नंबर टाकूनही पैसे लाटण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे आता या दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे अधिकृत अकाऊंट बनवले आहेत.
http://www.nanapatekar.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar and makarand anaspures official social media accounts
First published on: 31-08-2016 at 19:47 IST