मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे मंगळवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजल्यापासून संगीत, प्रसारमाध्यमे तथा तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सादरीकरण आणि रेकॉर्डिगमधील तंत्रज्ञानाचा वापर, मायक्रोफोनचा वापर, संगीताच्या प्रसारामध्ये छापील माध्यमांची भूमिका, स्टुडिओतील गाणे, संगीतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ‘व्हॉइस कल्चर’मध्ये होत असलेले बदल, कला आणि तंत्रज्ञान,  समाजमाध्यमे आणि संगीत यांसारख्या अनेक विषयांवर या चर्चासत्रात मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी १०.१५ वाजता मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील संकुलातील शाहीर अमर शेख सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. संजय देशमुख, विशेष अतिथी म्हणून पं. अरविंद पारीख उपस्थित राहणार आहेत. देवकी पंडित, अच्युत गोडबोले, प्रा. मुकेश गर्ग, रतीश तागडे, प्रदीप राऊत, श्रुती सडोलीकर आदी मान्यवर चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार असून दुपारी ३.४५ वाजता संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले आहे.