नटसम्राट’च्या माध्यमांतराची गोष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नटसम्राट’ हे नाटक चित्रपट स्वरूपात रुपेरी पडद्यावर येतं आहे, हे कानी पडताच एकच खळबळ उडाली होती. मराठी रंगभूमीवरील अभिजात कलाकृती असणाऱ्या वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक आधीच्या दोन पिढय़ांनी सातत्याने पाहिलं आहे, ते स्वत:त रुजवलं आहे. त्यालाही एक काळ लोटला आहे. आताच्या तरुण पिढीला हे नाटक माहिती आहे. पण बऱ्याच जणांनी ते दूरदर्शनवर पाहिलं आहे तर नव्या पिढीच्या येणाऱ्या लाटेला हे नाटक पहिल्यांदा चित्रपट रूपातच भेटणार आहे. एका अभिजात कलाकृतीचे माध्यमांतर होत असताना त्याचे जनमानसावर उमटणारे पडसाद हे असेच भिन्न असणार आहेत. आणि हे लक्षात घेऊनच दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनी या माध्यमांतराला सुरुवात केली. या प्रवासात मग ‘नटसम्राट’ म्हणून नाना पाटेकरांसारखा अभिनेता या चित्रपटाशी जोडला गेला. महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, नाना आणि विक्रम गोखलेंसारख्या दिग्गज नटांची जुगलबंदी आणि मुळात कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेलं हे जबरदस्त नाटय़ या सगळ्याचा एक वेगळाच आविष्कार सेल्युलॉइडवर नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळणार आहे. मात्र नाटय़कृती ते चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा पडद्यामागचा हा रंगतदार प्रवास कसा होता, याचा गप्पांचा प्रयोग खुद्द महेश मांजरेकर, नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, निर्माता विश्वास जोशी आणि ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन रंगवला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natsamrat movie team interview with loksatta
First published on: 27-12-2015 at 02:32 IST