प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नवीन पोलीशेट्टीचा विदेशात अपघात झाला आहे. नवीनचा नुकताच अमेरिकेत अपघात झाला असून त्याच्या टीमने या अपघाताच्या बातमीची पुष्टी केली आहे. नवीनची बाईक घसरली आणि तो खाली पडला व जखमी झाला. या अपघातात त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे, असंही टीमने सांगितलं. तसेच त्याच्या प्रकृतीबद्दल माहितीही त्यांनी दिली आहे.

नवीनच्या अपघाताबाबतच्या बातम्या येऊ लागल्यानंतर त्याच्या टीमने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना अपघाताची पुष्टी केली. “नवीन अमेरिकेतील डॅलसमध्ये बाईक चालवत होता, अचानक त्याचं बाईकवरचं नियंत्रण सुटलं. बाईक घसरली आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. हा अपघात काही दिवसांपूर्वी झाला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर अमेरिकेतच उपचार झाले. आताही तो तिथेच असून बरा होत आहे,” अशी माहिती त्याच्या टीमने दिली आहे.

Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar first engagement video viral
Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Chinmay Mandlekar said siddharth chandekar got injured during natak
“डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…
Siddhant Karnick
“सकाळच्या कॉफीपेक्षा सेक्स चांगला”, ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेत्याचं विधान चर्चेत, तृप्ती डिमरीबद्दल म्हणाला…

कोण आहे शेफाली शाहचा पहिला पती? ज्याने २४ वर्षांपूर्वीच्या घटस्फोटाबाबत केलंय विधान, त्याची दुसरी पत्नीही आहे अभिनेत्री

३४ वर्षांचा नवीन हा तेलुगूमधील आघाडीचा अभिनेता आहे. ‘मिस शेट्टी मिस्टर पोलीशेट्टी’ हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. नवीनने ‘छिछोरे’ या बॉलीवूड चित्रपटातही काम केलं होतं. त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.