करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नविना बोले हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – ‘म्हातारी’ म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

नविनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “सुंदर दिसणं हा एका महिलेचा जन्म सिद्ध अधिकार आहे. नुकतीच मला करोनाची लागण झाली आहे. मी सध्या आइसोलेशन आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने माझ्यावर उपचार सुरु आहेत. मला चाहत्यांच्या प्रार्थनेची गरज आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट तिने लिहिली आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

दहा वर्षांपुढील १५ पैकी १ व्यक्ती करोनाबाधित

दहा वर्षे वा त्यापेक्षा अधिक वयोगटातील १५ पैकी १ व्यक्ती करोनाबाधित झाली होती, असा निष्कर्ष दुसऱ्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. हे सर्वेक्षण १७ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर या काळात करण्यात आले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १८ वर्षांहून जास्त वयोगटातील ७.१ टक्के व्यक्तींना करोनाची बाधा झाली होती, असे आढळले. हे पाहता देशातील बहुतांश लोकसंख्येला करोनाबाधित होण्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ राज्यांतील ७० जिल्ह्यांमधील ७०० गावे व शहरी विभागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. याच जिल्ह्यांमध्ये ११ मे ते ४ जून या काळात पहिले सीरो सर्वेक्षण केले गेले होते, असे भार्गव यांनी सांगितले.