पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण करणारे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची ‘द कपिल शर्मा शो’मधून गच्छंती करण्यात आली होती. आता ते या शोमध्ये परतले आहेत, तेसुद्धा एका नव्या अंदाजात..’द कपिल शर्मा शो’च्या सेटवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने नुकतीच या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. शूटिंगदरम्यान तिने ‘बूमरँग व्हिडीओ’ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत सिद्धूंच्या लूकमधील एक व्यक्ती पाहायला मिळतेय. पिवळ्या रंगाची पगडी आणि निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्माच आहे. नवज्योत सिंग सिद्धूंच्या लूकमधला कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहून सिद्धूच सेटवर परतल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

‘द कपिल शर्मा शो’मधून नवज्योत सिंग सिद्धू गेल्यानंतर अर्चना पुरण सिंग परीक्षक म्हणून विराजमान झाली. शोमध्ये कपिलने अनेकदा सिद्धूंची आठवण काढली. यावरून त्याने काही वेळा अर्चना पुरण सिंगलाही सिद्धूंची खुर्ची चोरल्याचा टोलाही लगावला.

काय होते प्रकरण?

पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियेत त्यांनी एकप्रकारे पाकिस्तानची पाठराखण केली. सिद्धू यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांनी त्यांना शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर त्यांची ‘द कपिल शर्मा’ शोमधून गच्छंती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu is finally back in the kapil sharma show ssv
First published on: 15-01-2020 at 15:43 IST