बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी ती प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणमुळे चर्चेत आहे. आदित्यने नेहाला चक्क लग्नासाठी मागणी घातली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल’मध्ये हा आश्चर्यचकित करणारा प्रकार घडला. सोनी टीव्हीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.

‘बॉण्ड गर्ल’चं निधन, ‘त्या’ न्यूड सीनमुळे झाली होती प्रसिद्ध

“शेवटची अंघोळ कधी केली आठवत नाही”, जगातील सर्वात हॉट अभिनेत्रीचा अजब दावा

काय आहे व्हिडीओमध्ये?

नेहाने सर्वप्रथम ‘महफ़िल में तेरी हम ना रहे तो’ हे गाणे आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरासाठी गायले. हे गाणे गाताना नेहा थोडी भाऊक देखील झाली होती. त्यानंतर शोमधील वातावरणात पुन्हा एकदा खेळीमेळीचे करण्यासाठी आदित्यने ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणे गंमतीशीर अंदाजात नेहासाठी गायले. हे गाणे गात असताना आदित्यने तिला लग्नासाठी मागणी घातली. अर्थात हा सर्व प्रकार गंमत म्हणून सुरु होता. दरम्यान उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी सुरु असलेला प्रकार पाहून एकच हास्यकल्लोळ केला.

‘या’ अभिनेत्रीच्या आईनेच केली वडिलांची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी टीव्हीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी नेहा अशाच एका गंमतीशीर व्हिडीओमुळे चर्चेत होती. हा व्हिडीओ तिच्या आगामी म्यूझिक अल्बममधील गाण्याचा होता. गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना नेहा आपल्या सहकाऱ्याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळत होती. व तिचे सहकारी तिला प्रोत्साहन देत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत होते.