नेहाचं बहुचर्चित ठरलेलं ‘ख्याल रखा कर’ प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

नेहाच्या ‘त्या’ पोस्टमुळे रंगली होती सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर मध्यंतरी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. नेहाने ‘ख्याल रखा कर’ अंस कॅप्शन देत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती प्रेग्नंट दिसत होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची एकच चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर हा फोटो तिच्या नव्या गाण्याचा भाग असल्याचा खुलासा तिने केला होता. अखेर तिचं हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

प्रदर्शित झालेल्या गाण्यामधून एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीत मुख्य भूमिकेत झळकले आहेत. यात या दोघांमधील प्रेम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ८२ हजार पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

आणखी वाचा- नेहाला माझं सुख बघवत नाही- आदित्य नारायण

दरम्यान, या व्हिडीओमध्ये नेहाच्या लग्नातील काही क्षणदेखील दाखवण्यात आले आहेत. हे गाणं नेहाने गायलं असून यापूर्वी तिचं आणि रोहनचं नेहू दा व्याह हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे नेहाची ही दोन्ही गाणी सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neha kakkar and rohanpreet singh new song khyaal rakhya kar release video trending on youtbe ssj

ताज्या बातम्या