बॉलिवूडमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहा सध्या प्रत्येक नव्या चित्रपटात एक तरी गाणे गाताना दिसते. तिने तिच्या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर काही वेगळीच जादू केली आहे. गाण्यासोबतच नेहा तिच्या गमतीशीर डान्स व्हिडीओसाठी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या नेहाचा भाऊ टोनी कक्करला चपलेने मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नेहाचा भाऊ टोनी कक्कर एका मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. पण तितक्यात अचानक नेहा येते आणि चप्पल काढून टोनीला मारू लागते. त्यानंतर टोनी कान पकडून बहिणीची माफी मागू लागतो. बहिण- भावांचा हा मजेशीर व्हिडीओ पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ म्हणजे टोनीचे नवे गाणे ‘नागिन जैसे’ आहे. हे गाणे नुकताच प्रदर्शित करण्यात आले आहे.

टोनीचे ‘नागिन जैसे’ हे गाणे डान्स क्लासमध्ये शूट करण्यात आले आहे. तसेच या गाण्यात वेगवेगळ्या वयाच्या आणि वजनाच्या व्यक्तीरेखा दाखवण्यात आल्या आहेत. डान्स करण्याला वयाची मर्यादा नसते हे या गाण्यात दिसत आहे.

नेहाचा भाऊ टोनी कक्कर हा गायक आहे. त्याने गायलेले ‘कांताबाई’ हे गाणे लोकप्रिय ठरले होते. तरुणांनी तर या गाण्याला अक्षरक्ष: डोक्यावर उचलून धरले होते. नेहा ही मुळची दिल्लीची आहे. तिने २००६ मध्ये ‘इंडियन आयडल’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आता नेहा याच शोमध्ये अनु कपूर आणि विशाल दादलानीसोबत परीक्षक म्हणून बसलेली पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar ht his brother by shoes video viral on internet avb
First published on: 16-10-2019 at 18:53 IST