बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर २४ ऑक्टोबर रोजी लग्न बंधनात अडकणार असे म्हटले जात आहे. नेहा गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार आहे. आता सोशल मीडियावर नेहाचा रोका झाल्याचे समोर आले आहे.

नुकतात नेहाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर रोकामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाने फिंकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने साजेशी ज्वेलरी घातली आहे. ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान नेहा आणि रोहनप्रीत डान्स करताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना नेहा लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे. ती २४ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. रोहनप्रीत आणि नेहाने नुकताच एका म्यूजिक अल्बममध्ये एकत्र काम केले होते.

कोण आहे रोहनप्रीत?
रोहनप्रीत एक गायक आहे. त्याने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.