प्रसिद्ध बॉलिवूड गायक नेहा कक्करची एका विनोदी कार्यक्रमात खिल्ली उडवण्यात आली होती. नेहाची उंची आणि गाणे गाताना तिचे होणारे हावभाव यावरुन कीकू शारदा आणि गौरव गेरा या दोन प्रसिद्ध विनोदविरांनी नेहावर जोरदार विनोदी टोलेबाजी केली होती. यावर तिने सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाली नेहा?

“मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. परंतु माझ्यासोबत घडलेला तो प्रकार आता मी विसरले आहे. त्या कार्यक्रमात माझ्यावर केले गेलेले विनोद पाहून त्यावेळी मला खुप राग आला होता. परंतु आता मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही देखील विसरुन जा. कारण देव सगळं बघत आहे. देवच त्यांना शिक्षा करेल.” अशा शब्दात नेहाने आपली नाराजी व्यक्त केली.

यानंतर तिचा भाऊ टोनी कक्कर याने देखील कीकू व गौरव विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “माझ्या बहिणीची तिच्या उंचीवरुन उडवलेली खिल्ली मला बिलकूल आवडली नाही. ती अफाट मेहनत, जिद्द आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचली आहे. कुठल्याही व्यक्तीची त्याच्या शरीरावरुन अशी खिल्ली उडवणे योग्य नाही.” अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar slams gaurav gera kiku sharda for body shaming her mppg
First published on: 05-12-2019 at 20:05 IST